सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
चांबळी (ता. पुरंदर) येथील महेश उर्फ नामदेव पांडुरंग शेंडकर यांची छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था( सारथी) पुणे येथे वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण )म्हणून प्रतिनियुक्ती झाली आहे. त्याबाबतचे शासन आदेश शासनाचे सहसचिव टी. वा करपते यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.
नामदेव शेंडकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवेमधील 2006 चे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अधिव्याख्याता गट ब व वरिष्ठ अधिव्याख्याता गट - अ पदावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सातारा. बुलढाणा येथे काम केले आहे .तसेच सन 2017 ते 2020 या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. सध्या ते वरिष्ठ अधिव्याख्याता गट- अ पदावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे येथे कार्यरत होते. येवलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वरिष्ठ प्राथमिक शिक्षिका मंजुषा शेंडकर यांचे ते पती होत तर पुणे जिल्हा परिषदे चे निवृत्त शिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर ,दौंड ग्रामीण रुग्णालया चे निवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. विठ्ठल शेंडकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
त्यांचे या प्रति नियुक्ती बाबत चांबळी व शेंडकरवाडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS