सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी व मनोज जरांगे यांच्या मुंबईमध्ये होणाऱ्या दि. २६ रोजी पासूनच्या होणाऱ्या उपोषणाच्या पाठिंब्यासाठी तालुक्यातील सकल मराठा समाज दि. २४ रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे.
याबाबत आज बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील सकल मराठा समाजाची बैठक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे पार पडली. यावेळी सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील सकल मराठा समाज उपस्थित होता. बुधवार दि.२४ रोजा सोमेश्वर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून हा समाज मोठ्या संख्येने बारामती येथे जाणार आहे. तेथून कसबा येथील महाराजांच्या पुतळ्यास हार घालून मुंबईला रवाना होणार आहे. बारामती तालुक्यातील सर्व मराठा बांधव तिथे एकत्र येऊन भव्य स्वरूपात रॅली काढत मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. जे मराठा बांधव येणार आहेत त्यांनी आपापल्या गावातील मराठा समनवयकांशी संपर्क साधावा. तसेच येणाऱ्या मराठा बांधवांची नाष्टाची व जेवणाची व्यवस्था केली जाणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या संधर्भातील पुनः नियोजन करण्यासाठी मंगळवार दि.२३ रोजी सकाळी १० वाजता सोमेश्वर कारखाना गेस्ट हाऊस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.