सोमेश्वर रिपोर्टर टीम-----.
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जेष्ठ लेखक तथा ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांना रामराजे जगताप स्मृती गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
वाणेवाडी ता. बारामती येथे रामराजे जगताप स्मृती मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. यावेळी कामगार नेते तुकाराम जगताप, उत्तमराव भोसले, डॉ. रवींद्र सावंत, रमेश भोसले, पोपटराव भोसले, जयवंतराव भोसले, सुनील भोसले, दिग्विजय जगताप, किशोर भोसले, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जगताप, सचिव किरण जगताप, सर्व संचालक मंडळ यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले, मी सात वर्षांचा असताना भाऊसाहेब यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना जास्त जवळून पाहता आले नाही. मात्र त्यांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून तो आदर्श पुढे चालवण्याचे काम त्यांचे कुटुंब करत आहे. असे सांगत सोमेश्वर कारखान्याबाबत बोलताना ते म्हणाले, कारखान्यातील प्रत्येक घटकाच्या सिंहाच्या वाट्यामुळे सोमेश्वरचा राज्यात नावलौकिक आहे. मागील दहा वर्षात कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे
चार पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राज्यात ऊसाला उच्चांकी दराची परंपरा सोमेश्वर ने कायम राखली आहे. पकारखान्यामुळे परिसराचा कायापालट झालेला आपणास पहावयास मिळतो. एक हजारवरून आज नऊ हजार गाळप क्षमतेचा कारखाना झाला आहे. पूर्वी उसापासून फक्त साखर हाच व्यवसाय होता. मात्र आता डिस्त्रलरी, अल्कोहोल, इथोनॉल, सहवीज निर्मिती असे प्रकल्प उभे राहिले. लवकरच ३६ मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू होतील तसेच डिस्टलरीचे विस्तारीकरण ही सुरू आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केले. प्रास्तविक राजेंद्र जगताप यांनी केले तर आभार मा. अध्यक्ष चंद्रशेखर जगताप यांनी मानले.