सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे बारावीत शिकत असलेला अथर्व राजेंद्र वायाळ याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने आपल्या गटातील पहीले दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत.
खांडगाव, मध्य प्रदेश येथे चालू असलेल्या 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या 36 व्या राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी केली आहे. अथर्व वायाळ हा गेल्या दोन वर्षांपासून बारामती येथे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिक्षण घेत आहे तसेच प्रा. डॉ. गौतम जाधव यांच्याकडे नेटबाॅल खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. जिद्द व चिकाटीने सराव करत असल्यानेच अथर्व इथपर्यंत पोहोचला असे त्याचे प्रशिक्षक डॉ. गौतम जाधव म्हणाले. पुढेही त्याला उत्तम संधी आहे हे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र संघ या स्पर्धेत नक्कीच पहिल्या तीन क्रमांकात राहील व अथर्व चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.