सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वरवडी खुर्द ता.भोर येथील शेतकरी कुटुंबातील तसेच जवाहर कुस्ती संकुल भोरचा मल्ल पै.स्वप्निल राजेंद्र वरे याने भारतीय खेल प्राधिकरण (SAI) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थान पटियाला पंजाब (NIS) कुस्ती कोच (Grade-A) उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला.
शेतकरी कुटुंबातील स्वप्नील यांने जिद्दीच्या जोरावर वस्ताद सुनील शेटे व भोर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष मोहन खोपडे यांचे मारगदर्शनाखाली मेहनत घेऊन कुस्ती कोचचा अभ्यास पूर्ण करीत ग्रेड ए मिळवून उत्तीर्ण झाला.स्वप्नील याचे भोर तालुक्यातील कुस्ती शौकिनांकडून अभिनंदन होत आहे.