सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
तांदूळवाडी येथे एका महिलेचा हात पकडून माझ्यासोबत चल, म्हाताऱ्याला सोडून दे असे म्हणून विनयभंग केला आहे. याबाबत बारामती पोलिसांनी गणेश शशिकांत सावंत टी सी कॉलेज रोड शिवसृष्टी अपार्टमेंट तांदुळवाडी रोड बारामती याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत अशी, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी ११ ते २ च्या दरम्यान तांदुळवाडी रोडवर के मार्ट समोर असलेल्या गाळ्याजवळ आरोपी हा फिर्यादीचा सावत्र मुलगा फिर्यादीचा हात पकडून माझ्यासोबत चल म्हाताऱ्याला सोडून दे असे म्हणून महिलेचा विनयभंग केला आहे. पुढील तपास पो.स.ई जगदाळे एस बी हे करीत आहेत
COMMENTS