सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील ससेवाडी ता.भोर पुलावर एका भरधाव ट्रकने एसटी बस, पिकप तसेच ईरटीका गाडीला मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याची घटना शनिवार दि.२७ सकाळी घडली. अपघातात ईरटीका व पिकप गाडीतील ४ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
डंपरची सामूहिक चार वाहनांना पाठीमागून जोरदार धडक बसल्यानेवहा अपघात झाल्याचे समोर येत आहे. महामार्ग वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
COMMENTS