सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
भारतीय खेल प्राधिकरण (SAI ) यांच्यावतीने घेण्यात येणारा कोचिंग कोर्स नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट पटियाला पंजाब या ठिकाणी सिक्स वीक सर्टिफिकेट कोर्स घेण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातून बारामती तालुक्यातील पैलवान अवधूत कोरडे यांनी हा प्रशिक्षण कोर्स पूर्ण करून संपूर्ण भारतातून A ग्रेड संपादन केली.
. भारत सरकार क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने कुस्ती खेळाचे प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी SAI तर्फे हा प्रशिक्षण कोर्स घेण्यात येतो. देशभरातून आवाज दर्जाचे कुस्ती खेळाडू आणि कुस्ती कोच यामध्ये सहभागी होत असतात. यामध्ये अवधूत रवींद्र कोरडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून A श्रेणी संपादन केले आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच आगामी काळात ग्रामीण कुस्तीपटू घडवण्यासाठी लागेल ती मदत करू असे आश्वासनही पवारांनी दिले
COMMENTS