सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
समता आश्रम शाळा पाडेगाव येथील दहावी बॅच 2005-2006 माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्य क्रम तब्बल 18 वर्षांनी दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी जय दुर्गा मंगल कार्यालय पाडेगाव येथे 10 ते 5 या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तथा अध्यक्ष् म्हणुन मा. मुख्याध्यापक पवार डी टी सर उपस्थित राहिले. प्रमुख पाहुणे म्हणून सर्व आजी माजी शिक्षक, कर्मचारी असा साधारण 35 लोकांचा स्टाफ उपस्थित राहिला. या स्नेहमेळाव्याला महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून एकूण 75 विध्यार्थी उपस्थित राहिले
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अमोल धायगुडे यांच्यासह सचिन मदने, भरत माने, संदीप माने, नितीन जाधव, प्रशांत धायगुडे व मित्र परिवाराने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धायगुडे यांनी केले तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन यांचे वाटप केले.
शाळेतील विद्यार्थ्याचा उल्लास वाढवा यासाठी शाळेत श्री. अमोल धायगुडे, प्रल्हाद डांगे, महेश बोराटे, रोमा भोसले व सचिन मदने यांनी भाषण केले.
विध्यार्थी व शिक्षक यांच्यातील दुवा जपताना सामजिक बांधिलकी चे भान जपत सर्वांनी दहावी बॅच चे विध्यार्थी दिवंगत मित्र उमेश गडदरे व सध्या आजाराने त्रस्त असलेल्या हनुमंत कचरे यांना आर्थिक मदत करून सामजिक बांधिलकी जपत शिक्षकांचे संस्कार जिवंत असल्याचे दाखवून दिले.
शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप झाल्यावर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुले मुली जुन्या वर्गांमध्ये जावून फोटोशूट मधे रमून गेली.
यानंतर जय दुर्गा कार्यालय येथे स्नेह भोजन झाले आणि पुढील कार्यक्रम सुरू झाला. प्रथम श्री गणेशाचे पूजन झाले त्यानंतर शिक्षक सत्कार, विध्यार्थी ओळख झाली.
अमोल धायगुडे यांच्या सुत्रसंचलनाने सर्व शिक्षक व विध्यार्थी यांच्या डोळ्यांमध्ये अश्रुधारा दाटून आल्या.
यानंतर सर्व शिक्षकांचे भाषण झाले व असेच मोठे व्हा चांगलं काम करत रहा आम्ही तुमचे शिक्षक होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात आदरणिय श्री.पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अश्रूंची वाट मोकळी केली शाळेचे माजी दिवंगत अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी यांना श्रध्दांजली अर्पण केली. आजच्या युवा पिढीला मोबाईल मुळे किती दुष्परिणाम सोसावे लागत आहेत व त्यावर नियंत्रण आणून आपण चांगले माणूस म्हणून जगता येण्यासाठी काय काय करण आवश्यक आहे याची जाणीव निर्माण करून दिली आणि भावी आयुष्य जगण्यासाठी नवीन ऊर्जा दिली.
यानंतर अमोल धायगुडे यांनी विध्यार्थी आपले कुठे पोचले आहेत हे सांगितल्यानंतर सर्वांचा उर भरून आला.
"दिप माझ्या स्मृतीचे,
जाशील तेथे सांभाळ
कोण जानील कधी होईल
आयुष्याची संध्याकाळ"
तसेच शाळेकडे पाठ फीरवल्यामुळे किती दुःख होते हे सांगताना सांगितलेल्या गोष्टीमुळे सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
शेवटी सचिन मदने याने सर्वांचे आभार मानले. विद्यमान प्राचार्य माने यांनी खूप मोलाचे सहकार्य केले उपस्थित आजी माजी शिक्षक गायकवाड सर, ताम्हाणे,बोंद्रे, नलवडे, गोवेकर, भोसले, पाटोळे, बेस्के, देवरे, कवटे, जाधव, सावंत, मोरे, माने ग्रंथपाल, वाघमारे, सूर्यवंशी,टोणपे,गायकवाड,देवचे,दीपक,आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
COMMENTS