सुपे परगणा ! दीपक जाधव ! दुष्काळी भागातील पाणी उपसा योजनांना प्रथम प्राधान्य हवे : विजय शिवतारे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी 
दुष्काळी भागातील उपसा जलसिंचन योजनांना प्रथम प्राधान्य हवे असे प्रतिपादन माजी जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी केले. 
      सुपे येथील ग्रामसचिवालयासमोर शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने ' जनाई ' च्या हक्काच्या पाण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यास जाहिर पाठिंबा म्हणुन शिवतारे बोलत होते.
        शासनाने पाणी वाटप करताना प्रथम प्राधान्य दुष्काळी भागातील उपसा जलसिंचन योजनांना दिले पाहिजे. तरच या भागातील शेतकरी खर्या अर्थाने जगु शकेल. त्यासाठी उद्या मुख्यमंत्रांकडे हा प्रस्ताव मांडणार असल्याचे  शिवतारे यांनी सांगितले. उद्या होणाऱ्या मंत्रालयातील बैठकीला मी असणार आहे. सत्ता आपली असल्याने निश्चित बैठकीतुन मार्ग काढु, कारण उपोषण करणे चांगले नाही. त्याची किमत मला माहिती आहे. कारण गुंजवणीचे अपुर्ण असलेले काम पुर्ण करण्यासाठी मी उपोषण केले होते असे शिवतारे यांनी संगितले.  
       जनाई ची पाणीपट्टी माझ्या काळात १९ टक्के केली. त्यानंतर सरकार बदलल्यावर १ रुपया ६० पैसे असणारी २ रुपये ७० पैसे झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिलापोटी तिप्पट रक्कम भरावी लागत होती. आता आपले सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगुन पुन्हा पाणी पट्टीची रक्कम पुर्ववत केल्याचे शिवतारे यांनी सांगितले. 
    दरम्यान आज बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. तर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते विकास लावंड यांनी उपोषण कर्त्यांशी संवाद साधला.
     ...........................................
To Top