Baramati News ! शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत असलेल्या पारधी समाजातील हाफ मॅरेथॉनपट्टू 'रमाकांत'ला अखेर मिळाले रेशनिंग कार्ड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयात असताना तालुका, जिल्हा पातळीवरून राज्यपातळीवर निवड झालेला वडगाव निंबाळकर येथील गेल्या अनेक वर्षांपासून रेशनिंग कार्डसाठी धावत होता. मात्र प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आज काळे परिवाराला विभक्त रेशनिंग कार्ड मिळाल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार नसल्याने काळे परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 
             रमाकांत काळे हा पारधी समाजातील युवक २००८ साली वडगाव निंबाळकर येथे सव्वा एकर शेती जमीन खरेदी केली. मात्र एकत्र कुटुंबातील रेशनिंग कार्ड असल्यामुळे शासनाच्या योजनांपासून रमाकांत ला वंचित राहावे लागत होते. 
          बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील रहिवासी मीनाक्षी रमाकांत काळे व रमाकांत अवलचंद काळे या पारधी समाजातील दांम्पत्याला त्यांची विभक्त शिधापत्रिका नववर्षाच्या दिवशी सुपूर्द करण्यात आली.
        पारधी समाजातील अशिक्षितपणा व कुटुंबातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सदस्यांमुळे अनेक होतकरू तरुणांना मुख्य प्रवाहात येऊन व्यवसाय,नोकरी व शासकीय योजना यापासून वंचित राहावे लागते. रमाकांत अवलचंद काळे हे वडगाव निंबाळकर परिसरात चांगल्या पद्धतीने शेती करतात म्हणून विविध शासकीय योजना राबवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात परंतु शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने व काही सदस्य संपर्कात नसल्याकारणाने कागदपत्रांची मोठी अडचण या दांपत्यासमोर निर्माण झाली होती यावेळी त्यांनी ही अडचण कोऱ्हाळे खुर्द गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा रुग्णमित्र सुरज दत्तात्रय खोमणे यांच्याकडे मांडली, यावेळी त्यांनी वडगाव निंबाळकर चे मंडल अधिकारी तथा पुरवठा सहाय्यक शिवराम देष्टेवाड यांच्याकडे या विभक्त शिधापत्रिकेचे प्रकरण सुपूर्द केले, यावर कर्तव्याचा व माणुसकीचा संगम घालत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाला कोणतेही हेलपाटे न मारता सदरचे रेशन कार्ड वेळेमध्ये सुपूर्द केले.
       यावेळी या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता व त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू तरळले, यावेळी रमाकांत काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सुरज खोमणे व शिवराम देष्टेवाड यांचे आभार मानले.
To Top