सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र विठ्ठल शेंडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच भारती अनिरुद्ध सोरटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अश्विनी कर्चे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदी महेंद्र शेंडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे श्रीपाल सोरटे, अश्विनी कर्चे, मंदाकिनी सोरटे, राणी खोमणे, रणजीत सोरटे, अर्चना मासाळ, अमोल सोरटे रणजीत सोरटे, मधुकर सोरटे, नितीन सोरटे, सोमनाथ देशमुख, विलास पवार, सुशांत सोरटे, तुकाराम शेडकर, शिवाजी पवार, बाळासो क्षीरसागर, बाळासो सोरटे, शांताराम कर्चे, सुरज सागर बांदल, संतोष ननवरे, जाधव, अभिषेक शेडकर, विराज सावंत इतर बहुसंख्य ग्रामस्थ सोरटेवाडी उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ज्योती काळभोर यांनी कामकाज पाहिले.