सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
गडकोट मोहिमेदरम्यान भोर तालुक्यात रायरेश्वर किल्ल्यावरून पाय घसरून कोर्ले ता.भोर गावाच्या बाजूला तरुण दरीत कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.२५ घडली.
गडकोट मोहिमेसाठी रायरेश्वर किल्ल्यावर राज्यातून लाखोंच्या संख्येत धारकरी उपस्थित होते. किल्ल्यावर जातानाच हुपरी (कोल्हापूर) येथील २५ वर्षीय तरुण सागर वानींगडे दरीत कोसळला. या तरुणाची जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम भोरच्या जवानांनी तात्काळ मृत्यू झालेल्या तरुणाला बाहेर काढले.
COMMENTS