सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्य शिक्षिका व विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती महिला शिक्षण दिन म्हणून भोर येथे
साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रतिष्ठित महिला तसेच भोर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्याची महती जेष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे यांनी विषद केले.यावेळी महिला उद्योजिका शोभा चौधरी,बचत गट समन्वयक स्मिता गोडबोले, शहर उपजिविका केंद्र सारीका गायकवाड,छाया गुरव,सरपंच मंगल कंक यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय जाधव,उपाध्यक्ष विलास मादगुडे,जिल्हा संघ उपाध्यक्ष सूर्यकांत किंद्रे,प्रमोद कुलकर्णी, संतोष म्हस्के,अर्जुन खोपडे ,दीपक एडवे उपस्थित होते.