सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : ओंकार साखरे
अयोध्येत श्रीराम प्रतिस्थापनेच्या पार्श्वभूमीवर मेढा नगरीमध्ये श्रीराम मंगल कलशाची रथामध्ये ठेवून हरिणामाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
दि. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे नुतन बांधलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राण प्रतिस्थाना होणार असल्याने गावोगावी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन समारोप प्रसंगी करण्यात आले. यावेळी गुड्या तोरणे उभारून दिप उत्सव साजरा करावा तसेच मंगल कलश गावचे मंदिरात ठेवून तेथे सर्वांनी एकत्रीत पुजन करून अक्षदा वहाव्यात असे सुचित करण्यात आले.
मेढा एसटी आगारा पासून मगल कलशाची रथातुन मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली. छ.शिवाजीमहाराज भोसले या चौकातुन कलश मिरवणूक बाजार पेठेतुन गणेश मंदिरापर्यत नेण्यात येवुन तेथे मिरवणूकीची सांगता करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे हस्ते भारतमातेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. मिरवणूकी मध्ये विश्वंभर बाबा विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी केलेला श्रीरामाचा घोष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
कित्येक वर्षांनी श्रीरामाच्या स्थापनेचा सोहळा पहाण्याचे भाग्य आपणा सर्वांना मिळणार असल्याने दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजे पर्यत मंदिरामध्ये मोठा स्क्रिन लावून त्यावर सोहळा पाहण्याचे आहावन यावेळी करण्यात आले. अयोध्या येथिल श्रीराम मंदिराचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक वक्त्याने बोलताना केला. यावेळी उपस्थित तालुक्यातील एका गावातील एका व्यक्तीस मंगल कलश व अक्षदाचे वाटप करण्यात आले. श्रीरामाच्या घोषाने व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या मिरणूक सोहळ्यामध्ये महिलांसह पुरुष, मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.