सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कला, खेळ व संस्कृतीसाठी शालेय क्रीडा स्पर्धा व विविध गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आपल्या अंगभूत कलांना वाव देण्यासाठी उपयुक्त ठरतात व त्या अनुषंगाने येणाऱ्या भविष्य काळात त्यांच्यासाठी प्रेरक ठरतात असे मत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर प्रशालेचा पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धी कॉलेज फार्मसी, चिखलीचे डॉ.प्रवीणकुमार साबळे होते. यावेळी बोलत असताना साबळे यांनी ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत माजी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन शालेय पायाभूत सुविधेत हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळामध्ये फार्मसी अभ्यासक्रमाचा समावेश करावा ही मागणी केली. विद्यार्थ्याने आपले संस्कार, व ज्ञानाची उंची सतत उंचावत जावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अफलातून सादरीकरणाने उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. याप्रसंगी शालेय क्रीडा स्पर्धा अहवाल वाचन वाडकर डी.टी यांनी केले तर बौद्धिक स्पर्धा वाचन राणी शेंडकर यांनी केले. स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन प्रणिता खोमणे, संस्थेचे सचिव भारत खोमणे, उद्योजक राजू धुर्वे, वैशाली साबळे, माजी मुख्याध्यापक डी, एम, साबळे , पत्रकार संतोष शेंडकर, पत्रकार महेश जगताप, पत्रकार युवराज खोमणे, सुजाता जगताप प्रशालेचे प्राचार्य पी.बी जगताप, पर्यवेक्षक आर. बी नलवडे, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी बी.जगताप यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र झुरंगे यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आभार स्नेहसंमेलन प्रमुख युवराज शिंदे यांनी तर विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक आर बी नलवडे यांनी मांडले.
COMMENTS