सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले गेले नसल्याने भोर तालुक्यातील आशा सेविका तसेच गटप्रवर्तक यांनी मंगळवार दि.१६ काम बंद आंदोलन करून संप पुकारला. काम बंद आंदोलनाचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी दिले.
संपामुळे ग्रामीण भागातील रुग्ण सेवेवर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.आशा सेविकांनी दीड महिन्यापूर्वी केलेल्या संपामुळे आरोग्य मंत्री यांनी मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय अद्याप निर्णय झालेला नाही या पार्श्वभूमीवर अशा सेविका तसेच गटप्रवर्तकांनी संप पुकारला आहे.निवेदन देताना विठ्ठल करंजे ,अशा सेविका भोर तालुका अध्यक्ष राजश्री गिरे ,कविता आ, शारदा चौबे आदींसह शेकडो आशा सेविका संपात सहभागी झाल्या होत्या.
COMMENTS