वाई ! सोडचिठ्ठी देण्याआधी दुसरे लग्न करतोयस का? असे म्हणत पतीस बेदम मारहाण : भुईंज पोलिसांत पत्नीसह सात जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
लगडवाडी ता. वाई येथील पतीस मारहाण प्रकरणी पत्नीसह सहा जणांवर भुईंज पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. २७ रोजी ८:३० वा. ते दि. २८ रोजी तीनच्या दरम्यान लगडवाडी ते लोणंद प्रवासा दरम्यान किरण भिलारे, सोमनाथ भिलारे, संभाजी भिलारे, सोन्या ( पूर्ण नाव माहीत नाही ), गणेश भिलारे, प्रथमेश भिलारे, नीलम घाडगे रा. लोणंद यांनी जबरदस्तीने घरात घुसून शुभम घाडगे ( फिर्यादी ) याचे पत्नी पटत नसल्याने सोडचिठ्ठी देयच्या आधी दुसरे लग्न करतोयस का असे म्हणून फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. गिझरने, कुऱ्हाडीचा तुंब्याने जबर मारहाण करून घरामधून बाहेर आणून ईरटीका गाडीमध्ये बसवून शिरगाव गावचा घाटातील घाटमाथ्यावर नेऊन तेथे असलेल्या हॉटेलच्या समोर गाडी उभी करून पुन्हा मारहाण केली. तसेच फिर्यादीस दारू देखील पाजली तसेच वाठार मार्गे लोणंद येथील मेहुण्याच्या घरी नेऊन फिर्यादीस त्याच्या पत्नीने देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर वरील लोकांनी फिर्यादीला मध्यरात्री तीन वाजता लोणंद येथील बस स्थानकात नेऊन सोडले तेथून ते सर्व जण निघून गेले म्हणून त्या सात जणांचा विरोधात फिर्यादी याने भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास पोहवा दगडे करत आहेत.
To Top