सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
मध्यप्रदेश येथून बटाटा भरून निघालेला ट्रक पहाटेच्या वेळी ड्रायव्हरला लागलेल्या साखर झोपेतील डुलकीमुळे नीरा मोरगाव रस्त्यावरती अरुंद असलेल्या रस्त्यामुळे ट्रक पलटी झाला.
मध्यप्रदेश येथून वेफर्स साठी लागणारा बटाटा भरून सातारा मध्ये डिलिव्हरी करण्यासाठी निघालेला ट्रक क्र M P 09 HH 6589 हा मुर्टी नजीक जाधव वस्ती येथे सकाळी सहाच्या दरम्यान ड्रायव्हरला लागलेल्या डुलकीमुळे रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रक चालक राम वर्मा रा.मध्यप्रदेश जि. करडोन याला किरकोळ दुखापत झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदीमुळे ड्रायव्हरला कोणतीही इजा झाली नाही. व ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला नाही. अधिकचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहे.