सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असली तरी रब्बीतील पिकांसाठी पाण्याचा अभाव नेहमीच भासत असतो.सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असताना धोम - बलकवडी धरणाचे पहिले आवर्तन सोडले गेले नसल्याने बंधारे कोरडे पडले आहेत,विहिरी आटल्या तर पाण्याअभावी पिके जळून लागल्याने पूर्ण परिसर भकास झाला आहे.परिणामी भोरच्या दक्षिणपट्टीतील शेतकऱ्यांना कोणी पाणी देता का पाणी अशी आर्त हाक प्रशासनाला द्यावी लागत आहे.
धोम बलकवडी धरण झाल्यापासून धरणाच्या उजव्या कालव्याला दरवर्षी रब्बीतील पिकांसाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिले वर्तन सोडले जाते.यामुळे वीसगाव खोऱ्यातील नेरे, आंबाडे ,पाले, पळसोशी, धावडी ,बाजारवाडी ,खानापूर ,बालवडी, वरवडी भाबवडी तर चाळीसगाव मधील टीटेघर,रावडी, कर्नावड ,वडतुंबी,आंबवडे येथील शेतकऱ्यांची ९५० हेक्टरवरील रब्बी पिके पाण्याखाली येऊन पिकांना पाणी मिळते.मात्र यंदा धोम -बलकवडी धरण कालव्याला पाणी सोडले गेले नसल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी,नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असून वन्य प्राणी पाण्यासाठी वन वन भटकत असल्याचे चित्र आहे.
पाणी सोडण्याचा उग्र आंदोलन छेडणार
रब्बी पिके जळून जात आहेत. पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासत आहे.लवकरात लवकर जलसंपदा विभाग प्रशासनाने दोन बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी पाण्याचे आवर्तन सोडावे अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
आमच्या हक्काचे पाणी द्या
धोम -बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्यासाठी आमच्या नेरे,पाले, आंबाडे, पळसोशी ,गोकवडी ,निळकंठ,रावडी, कर्णावड,खानापूर , टिटेघर, चिखलगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत धरण आमच्या उशाला असले तरी पाण्याच्या प्रतीक्षेत कायमच आमच्या घशाला कोरड आहे.आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या,आमची रब्बीत पिके जळून वाया जाऊ लागले आहेत अशी वीसगाव चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांकडून प्रशासनाला आर्त हाक दिली जात आहे.
COMMENTS