सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
शिरवळ ता.खंडाळा येथील मुस्लिम ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी परवेज काझी यांची तर व्हाईस चेअरमनपदी पञकार मुराद पटेल यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी संचालक माजी चेअरमन रफिकभाई खान,संचालक आरीफभाई सय्यद,आसिफभाई खान,दिलशाद पठाण,तायरा बागवान,आय्याजभाई पठाण, तबरेज बागवान,मुक्तारभाई काझी,योगेंद्र उर्फ पिंटू गळंगे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. शिरवळ ता.खंडाळा येथील मुस्लिम ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.यामध्ये चेअरमनपदासाठी परवेज काझी यांचा तर व्हाईस चेअरमनपदासाठी पञकार मुराद पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी नूतन चेअरमन परवेज काझी व नूतन व्हाईस चेअरमन पञकार मुराद पटेल यांचा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना सचिव अमीर भालदार,लिपीक प्रतिक्षा खुडे यांनी सहकार्य केले.
COMMENTS