सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिके पाण्याविना सुकून चालली होती तर विहिरी बंधारे आटल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती.शेतकऱ्यांची दुरावस्था पाहून सोमेश्वर रिपोर्टरने वीसगाव,चाळीसगाव खोऱ्यात पाणीबाणी असे वृत्त छापले होते.याची दखल घेऊन धोम - बलकवडी धरनाच्या उजव्या कालव्याला आवर्तन सोडले.
वीसगाव,चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिकांची पेरणी होऊन पिकांची उगवण उत्कृष्ट झाली होती.पिके दहा ते पंधरा दिवसानंतर जोमात येऊ लागली असतानाच पिकांना पाण्याचा तुटवडा भासू लागला.दरम्यान धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला प्रशासन आवर्तन सोडेल या प्रतीक्षेत शेतकरी होते.मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्येकडे डोळेझाक करीत असल्याने पिके जळून चालली होती तर विहिरी ओढे -नाले कोरडे ठणठणीत पडले होते.यामुळे परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती तर पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उद्भवला होता.सध्या धरण प्रशासनाने सद्या ३०० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. एक दिवसानंतर ४५० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.रब्बी पिकांना पाणी मिळणार असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज असल्याचे चित्र आहे.
आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
धोम् -बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला आवर्तन सुटले गेले नसल्याने वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यातील हजारो हेक्टरवरील ५० टक्के शेती पिके पाण्याविना जळून वाया गेली होती.मात्र सध्या सुटलेल्या ३०० क्यूसेक्सच्या आवर्तनामुळे उर्वरित रब्बी पिकांना दिलासा मिळाला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाले असे शेतकरी राजू धोत्रे व मारुती थोपटे यांनी सांगितले.
COMMENTS