सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी मराठा आरक्षणची लढाई जिंकली याच आरक्षणाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आणि गुलाल उधळण्यासाठी करंजेपुल मधील महिलांनी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला.
गुलालाची उधळण करत जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा देत केक कापून आनंद साजरा केला.
या वेळी ग्रामपंचायत सदस्या कोमल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटणीस सोनाली गायकवाड, नम्रता गायकवाड, शैलजा सावंत, स्नेहा गायकवाड, सारिका गायकवाड, डॉ. सुखदा जगताप, सारिका प्रशांत गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.
COMMENTS