सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील एका गावातील २९ वर्षाच्या महिलेला पहिल्या नवऱ्यापासून सोडचिठ्ठी मिळवून देतो, तुझ्याशी लग्न करतो असे सांगून फुलेनगर येथील प्रतीक् मोरे यांने दि. १८ एप्रिल २०२३ ते ते १ डिसेंबर २०२३ च्या सकाळी ११.३० वाजेपर्यंत बलात्कार केल्याचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एका २९ वर्षाच्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या महिलेला प्रतिक मोरे याने फुलेनगर येथे, मांढरदेव येथील लॉजवर, तसेच प्रतिक मोरे याचा पसरणी येथील मित्र मंजित गायकवाड याच्या घरी अशा ठिकाणी पहिल्या नवऱ्यापासून सोडचिठ्ठी मिळवून देतो असे म्हणून मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले, याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. यावरुन प्रतिक मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण हे तपास करत आहेत.