सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.५५ वा बारामती शहरातील सिनेमा रोड येथील हॉटेल गंगासागर लॅज येथे एक महिलेचा खुन झालेला आहे.
अशी बातमी पोलीसांना मिळताच पोलीस सदर ठिकाणी पोहचले व पोलीसांनी तपासाची चके सुरू केली. सदर गुन्हयातील मयत महिलेचे नाव रेखा विनोद भोसले वय ३६ रा. सोनवडी ता. दौंड जि. पुणे असल्याचे निष्पन्न झाले असून तिचा खुन तिचा पती विनोद गणेश भोसले रा. वी विंग रूम नं.२ म्हाळसाई कृपा आप्पा शास्त्री नगर कोपर रस्ता डोंबवली याने केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा खुन केल्याचे पोलीसांचे तपासात प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून त्या मयत महिलेचे वडील महादेव धोंडीबा सोनवणे वय ५८ रा. सोनवडी ता. दौंड जि. पुणे यांनी विनोद गणेश भोसले रा. वी विंग रूम नं.२ म्हाळसाई कृपा आप्पा शास्त्री नगर कोपर रस्ता डोंबवली याचे विरूद्ध फिर्याद दिल्याने रात्री उशिरा पोलीसांनी त्यांचे विरुद्ध खुनाचा भादवी कलम ३०२ प्रमाणे नोंद केलेला असून पोलीस सदर गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत. आरोपीचा शोध चालू असून तपासकामी वेगवेगळी तपास पथके रवाना करण्यात आलेली आहेत.
सदर गुन्हयाचा तपास पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, संजय जाधव अपर पोलीस अधिक्षक बारामती, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेके व इतर अधिकारी, अमंलदार हे तपास करीत आहेत.