Baramati Breaking ! दीपक जाधव ! पानसरेवाडीत विषबाधेने १४ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यु

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
पानसरेवाडी हद्दीतील तांबे वस्तीवरील मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्यां चरण्यासाठी गेलेल्या शेताता दुपारी तीनच्या दरम्यान एका मागे एक अशा १४ शेळ्या मेंढ्यांचा अचानक मृत्यु झाल्याची घटना गदादेवस्ती नजीक असलेल्या खार ओढ्यातील शेतात घडली. या घटनेने परिसरातील मेंढपाळात घबराहट निर्माण झाली असुन या मेंढपाळाला शासनास्तरावर त्वरित मदत मिळण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. 
           किसन विठोबा तांबे असे शेळ्या मेंढ्या दगावलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे शेळ्या मेंढ्यांना चारण्यासाठी मेंढपाळ गेला होता. त्यावेळी दुपारी तीन वाजता खार ओढ्यानजीक असलेल्या शेतातील विहिरीचे पाणी पाजुन बकरी चरत होती. यावेळी अचानक एका मागे एक अशा ४ शेळ्या आणि १० मेंढ्यांचा मृत्यु  होत असल्याची घटना घडली. त्यावेळी या मेंढपाळाने घाबरलेल्या अवस्थेत इतरांना माहिती दिली. त्यावेळी येथील माजी सरपंच बाबासाहेब पानसरे, राजेंद्र पानसरे, अभिजित पानसरे, माजी उपसरपंच आपासाहेब तरटे, रघुनाथ चांदगुडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी या मेंढ्यांचा मृत्यु विषबाधेने झाला की काही कारणाने झाला आहे याची चर्चा झाली. यावेळी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडुन शवविच्छेदन करण्यात आले आहे.
          दरम्यान येथील गावकामगार तलाठी नितीन यादव, राहुल बोडरे यांनी प्रत्यक्षदर्शनी घटनास्थळी भेट दिली. तसेच येथील घटनेचा पंचनामा केला. यावेळी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडुन शवविच्छेदन केलेला अवाहाल येईल. त्यानंतर या घटनेचा उलगडा होण्यास मदत होईल. या मेंढपाळाला शासनस्तरावर योग्य ती मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.            ...........................
 
To Top