सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
केडगाव ता.नगर (जिल्हा अहमदनगर) सेंट्रो गाडीने मांढरदेवीला दर्शनासाठी आंबाडखिंड घाटात घाट चढताना जाताना ब्रेकच्या पॅड खाली पाण्याची बाटली आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एमएच -४२ एच -०४९७ ही कार ५० ते ६० फूट दरीत कोसळली .अपघातात दोन जन जखमी झाले असून उपचारासाठी भोर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
नगरहून सेंट्रो गाडीने काळुबाई देवीला मांढरदेव घाटमार्गे जात असताना सेंट्रो गाडी चालकाचे नियंत्रण सुटले.यावेळी घाट चढताना सेंट्रो पुलावरून शंभर फूट दरीत कोसळली.गाडीमध्ये सहा जण एकाच घरातील यात्रेकरू होते.त्यातील दोन जखमी असून चार जण सुखरूप आहेत. उपजिल्हा रुग्णालय भोर येथील १०८ रुग्णवाहिका व त्यावरील डॉ. मिलिंद कांबळे व पायलट सुभाष हाळे तात्काळ घटनास्थळी पोहोचून रुग्णांना सेवा दिली.
COMMENTS