Baramati News l ट्रॅकर व दुचाकीच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी : निरा-बारामती रस्त्यावरील निंबुत येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा-बारामती रस्त्यावर निंबुत नजीक लक्ष्मीनगर येथे ऊसाचा ट्रॅकर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
         लोणंद ता. खंडाळा येथील तीन जण दुचाकी क्रमांक एमएच १४ डीजी ७३५३ वरून निरेकडून बारामतीच्या दिशेला जात असताना त्याच वेळी ऊसाने भरलेला ट्रॅकर क्र. एमएच ११ एल ४२०७ हा देखील निरेकडून सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघाला असता या दोन वाहनात अपघात होऊन यामध्ये सुजल अशोक पवार वय १४, करण राजू जाधव वय २५ व कार्तिक कारण जाधव वय ४, तिघे राहणार लोणंद ता. खंडाळा हे जखमी झाले आहेत. जखमींना वाघळवाडी व निरा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास करंजेपुल पोलीस करत आहेत.
To Top