पुरंदर l राहुल वाघोले l पोर्णिमेच्या चांदण्यात रंगला श्रीनाथ म्हस्कोबांचा लग्न सोहळा : फटाक्यांची आतषबाजी, लाखो भाविकांची उपस्थिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
परिंचे : राहुल वाघोले
श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर  फटाक्यांची आतषबाजी करत सवाई सर्जाच्या जयघोषात श्रीनाथ म्हस्कोबांचा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शाही थाटात संपन्न झाला. यावेळी मानाच्या पालख्या व वस्त्र परिधान केलेल्या काठ्यांची पारंपरिक भेट झाली हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वीर येथे दाखल झाले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.
  शुक्रवार (दि .२३)  रोजी पहाटे  ५.०० व पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर ६ वा. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला व सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १०.३० वा. देवाला दही- भाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी १२ वा. धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मि. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. देवाचा लग्नसोहळानिमित्त मंदिरात फुलांची विविध प्रकारची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठी दिलीप जयसिंगराव धुमाळ (माजी विश्वस्त) व मित्र परिवार यांचेमार्फत करण्यात आले. 
क्षेत्र कोडीत ची काठी-पालखी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी ७ वा. श्री क्षेत्र वीर येथे आली. यावेळी देवाची धुपारती घेऊन मुकादम-पाटील, विश्वस्थ, मानकरी, दागीनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटाभेट होऊन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर काठी-पालखी तळावर स्थानापन्न झाली. रात्रौ. ११.०० वा. समस्त राऊत मंडळीच्या वतीने  देवाला पोशाख करून देव-देवतांना आव्हान करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीत उत्सवमूर्ती ठेऊन ढोल-ताश्याच्या गजरात तसेच कोडीत ची पालखी बाहेरून अंधारचिंच येथे गेल्या. त्यावेळी मानकं-यांना (शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण) फुलाच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कण्हेरी पालख्यासह काठ्यांची भेटाभेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर गावचे मुकादम पाटील चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्रो ३ वा. लग्नाला सुरुवात झाली. लग्न सात मंगलाष्टके होऊन लग्नसोहळा संपन्न झाला. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाईसाठी नितीन शेंडकर, पुणे यांचेमार्फत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी स्वप्नील हरकळ (विघ्नहर्ता डेकोरेटर्स पुणे) व प्रसाद  साळुंखे यांनी केली.  यावेळी पुरोहित दीपक थिटे, नंदकुमार थिटे, श्रीकांत थिटे यांनी पौराहित्य केले. सर्व काठ्या-पालख्या ग्राम प्रदक्षिणेसाठी गेल्या.   
वीर गावचे मुकदम पाटील सोबत सर्व दागीनदार, सालकरी, मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात येत आहेत. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ , उपाध्यक्ष रवींद्र  धुमाळ, विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ , विश्वस्त हनुमंत धुमाळ, नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे  व सल्लागार इ. मंडळींनी ट्रस्ट तर्फे व्यवस्था पहिली.
...
To Top