भोर l नागरिकांची सरकारी कामे होणार सोयीस्कर : आमदार संग्राम थोपटे ! भोर शहरात प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी १५ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झालेले आहे.लवकरच सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणावर येत असल्याने तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय कामे करताना ससेहोलपट न होता सोयीस्कर होणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
     शहरातील नवीआळी येथे प्रशासकीय इमारत बांधणे रक्कम १५ कोटी ९९ लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार थोपटे शुक्रवार दि.२३ बोलत होते.प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांत ऑफिस, तहसिलदार कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार विभाग, विद्युत विभाग, उपकोषागार, रजिस्टर ऑफिस यासह अनेक शासकीय कार्यालय एकाच इमारतीमध्ये होणार असल्यामुळे नागरिकांना सर्व सेवा एकच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच पार्किंग सुविधा ही उपलब्ध होणार आहे असेही आमदार थोपटे यांनी सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,माजी उपसभापती बाळासाहेब थोपटे,बाजार समिती सभापती आनंदा आंबवले, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर,अभिजीत सोनवले,गटनेते सचिन हरणस्कर,माजी उपनगराध्यक्ष समीर सागळे,रामचंद्र आवारे, चंद्रकांत मळेकर,माजी नगरसेवक गणेश पवार,अमित सागळे,सुमंत शेटे,जगदीश किरवे,गणेश मोहिते, संतोष केळकर,योगेश मेटेकर,सुमंत गांधी, प्रकाश जाधवर,तसेच भोर तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top