सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी येथील न्यू इग्लिश स्कूलच्या १९८५च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. विशेष म्हणजे या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळा सोडून ३९ वर्षानंतर आयोजित केला होता.
न्यू इग्लिश स्कूल वाणेवाडीच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘मला पुन्हा एकदा शाळेत जायचय!’ आणि ‘गुरुजन कृतज्ञता सोहळा’ या बोध वाक्याला अनुसरून स्नेहमेळावा आयोजित केला. विद्यालयाच्या सभागृहामध्ये १९८४-१९८५ या शैक्षणिक वर्षात दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आला. तत्कालीन दहावीच्या वर्गातील १०० पैकी ६१ माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या वेळी उपस्थित होते. यामध्ये ५२ विद्यार्थी आणि ९ विद्यार्थिनी होत्या.
विद्यालयाच्या सभागृहामध्ये १९८४-१९८५ या शैक्षणिक वर्षात दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे ढोल-लेझीमच्या गजरात शिक्षक व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत या परिपाठासाठी पुन्हा एकदा सर्वजण प्रार्थनेसाठी त्याच मैदानावर ई. १०वीचे विद्यार्थी असल्याप्रमाणे रांगेत उभे होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आला, त्यावेळचे शिक्षक पुन्हा वर्गात आले आणि त्याच ३९ वर्षापूर्वीच्या शालेय दिवसांची सर्वांना आठवण झाली.
स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी १९८५ साली इंग्रजीचे अध्यापन करणारे पंचक्रोशीतील प्रख्यात असलेले शिस्तप्रिय गुरुवर्य काशिनाथ शिंदेसर हे होते. या सोहळ्यास विद्यालयाचे तत्कालीन शिक्षक आनंदराव सांडभोरसर, प्रभाकर काळेसर, मोतीराम चव्हाणसर, जाफर शेखसर, शहाबुद्धीन मणेरसर, पठाण अकबरसर, रंजना भापकर मॅडम हे शिक्षक उपस्थित होते.
स्नेहमेळाव्याची सुरुवार छ.शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ.शेडगे दत्तात्रय यांनी केले. या स्नेहमेळाव्यात उपस्थित सर्व गुरुजनांना कृतज्ञता सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. दिवंगत गुरुजन व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून समारंभाला सुरुवात करण्यात आली. या स्नेहमेळाव्यात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करीत स्वतःचा परिचय करून दिला. तर काहींनी कविता, जुन्या आठवणींच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. सर्वच शिक्षकांनीही या वेळी आपली मनोगत व्यक्त केले.
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.
या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सकाळी १० वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे ढोल-लेझीमच्या पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रय, अनिल कदम, शेखर भोसले, हेमंत शिंदे आणि हेमलता पोरे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी हा माजी विद्याथ्यार्ंचा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या बाहेर असूनही ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्याथ्यार्ंनी व्यक्त केली.
याप्रसंगी उपस्थित गुरुजनांनी त्याकाळातील आठवणीना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेचे कारण स्पष्ट करण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा किती मोठा विचार त्यामागे होता हेही स्पष्ट केले. त्याचबरोबर वयाची ५५ वर्ष पार केलेल्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या कुटुंबाला कसे वागवावे याचे अनमोल मार्गदर्शन केले आणि शुभाशीर्वाद दिले.
एकत्र जमलेल्या मित्रमैत्रिणींनी दैनंदिनी, कौटुंबिक खुशाली, आरोग्य आदीविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पुढीलवर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन स्नेहमेळाव्याची सांगता झाली. ३९ वर्षांनंतर होणाऱ्या या स्नेहमेळाव्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने अनिल कदम, शेखर भोसले, हेमंत शिंदे, कैलास भोसले, युवराज चव्हाण, सुनील खोमणे, प्रमोद बावकर, राजेंद्र वायसे, हेमलता कुडाळकर/पोरे, अजय तुळशे, लंका बनकर, भरत कुंभार, नारायण फरांदे, राजेंद्र जगताप, दत्ता बुनगे, रवींद्र निगडे, विनायक कदम, प्रवीण माने या आणि अशा अनेक मित्रांनी अतिशय मनापासून या स्नेह मेळाव्याला लौकिक स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.
COMMENTS