Bhor News l कुस्ती क्षेत्रात पुरुषांच्या पुढे महिलांचे एक पाऊल, महिला कुस्ती क्षेत्रात अव्वलच : खा. सुप्रिया सुळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुरुषांप्रमाणेच महिला जिद्द,चिकाटी आणि कष्ट करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्रीडा क्षेत्रात पुढे जात आहेत.महिलांनी कुस्ती क्षेत्रातही पुरुषांच्या पुढे एक पाऊल टाकल्याने महिला कुस्ती क्षेत्रात अव्वल असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिपादन केले.
     भोर येथे शनिवार दि.२५ श्री ग्रामदैवत वाघजाई देवी यात्रा महोत्सव निमित्त पैलवान प्रतिष्ठान आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात महिलांची कुस्ती जोडताना खासदार सुळे बोलत होत्या.कुस्ती आखाड्यात ५ हजार ते २ लाख ५० हजार रुपये पर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या.बहुतांशी मल्लांनी चितपट कुस्त्या करून हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पाणी फेडले.दरम्यान खासदार सुळे यांनी भोर दौऱ्यावर असताना वाघजाई माता देवीचे दर्शन घेऊन भाविक-भक्त तसेच कुस्ती शौकिनांच्या भेटी-गाठी घेतल्या.यावेळी यात्रा कमिटीतील पै.बाबू शेटे,माजी नगरसेवक यशवंत डाळ,बाळू खुटवड,सोमनाथ ढवळे, एकनाथ रोमन, राजेंद्र गुरव, सचिन मांडके, दशरथ कांबळे ,सुरेश वालगुडे, सचिन चोरघे, अमित जाधव, चंद्रकांत पवार,रवींद्र बांदल ,अनिल पवार ,नितीन सोनावले,संदीप नांगरे,अनुप धोत्रे आदींसह पंच व  कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top