सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका वारकरी सेवा संघ, सोनार समाज संघटना, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सोमेश्वर मंदिर, करंजे येथे बहुसंख्य वैष्णव जन भाविक भक्तांच्या उपस्थितीत संत नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला,
यावेळी बारामती तालुका सोनार समाज सेवा संघांचे विश्वस्त, इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांचेसह इंडिया बुलिअन ज्वेलर्स असोसिएशन चे संचालक अमृतराज मालेगांवकर, बारामती सराफ असोसिएशन चे संचालक दिपक आळंदीकर, विमल आळंदीकर हे उपस्थित होते.
या निमित्त सकाळी १०:१५ ते १२:१५ यावेळेत ह.भ.प.श्री आकाश महाराज जगताप यांचे किर्तन झाले. संतांच्या निर्वाणींचा अभंग होऊंन मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, महाआरती , पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संतांच्या या पुण्यतिथी उपक्रमास वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याचे मा.
अध्यक्ष बाळासाहेब बारवकर, तालुका उपाध्यक्ष मोहन भांडवलकर ह.भ.प. गणेश महाराज बालगुडे भाऊसाहेब भांडवलकर , बाळासाहेब भांडवलकर , भाऊसाहेब बालगुडे ,देशमुख आण्णा ,मुर्ती भजनी मंडळ , सोमेश्वर भजनी मंडळ ,करंजे आणि सोनार समाज बांधव व वारकरी सेवा संघ बारामती तालुका सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते ,श्री.आळदीकर परिवार आणि श्री.सोमेश्वर देवस्थान च्या वतीने उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
वारकरी सेवा संघाच्या वतीने सर्व संतांच्या तिथी नुसार पुण्यतिथी दरवर्षी साजऱ्या करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब बारवकर व मोहन भांडवलकर यांनी सांगितले.
COMMENTS