सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
माजी नगरसेवक केदार देशपांडे यांची भोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवडीचे पञ दिले असुन राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते नसरापूर येथे झालेल्या शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात पञ देण्यात आले.
केदार देशपांडे यांनी मागील एका पंचवार्षिकला भोर नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. तर काही काळ ते शिवसेनेत युवासेना प्रमुख म्हणून होते.भोर शहरात घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहोचवणार असल्याचे केदार देशपांडे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप,युवा नेते विक्रम खुटवड,माजी जि.प.सदस्य चंद्रकांत बाठे,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर,विश्वजीत जगताप,मंदार वीर उपस्थित होते.
COMMENTS