भोर l आंबाडेत मातृगंध फाउंडेशनकडून वाचन, मार्गदर्शन व पुस्तक वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
मातृगंध फाउंडेशन पुणे यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा आंबाडे येथे वाचन मार्गदर्शन शिबिराचे शनिवार दि.१५ आयोजन केले होते. संस्थेच्या प्रमुख नीलक्षी सालके यांनी विध्यार्थी व उपस्थित शिक्षक यांना मार्गदर्शन करून वाचनाचे महत्व सांगितले.तसेच सोशल मीडियाच्या गैरवापराने होणारे दुष्परिणाम समजावून सांगत ३२७ विध्यार्थ्यांना गोष्टीरूप व संदर्भपर पुस्तकाचे वाटप केले.
     विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गोष्टीरूप व संदर्भपर पुस्तकांचे नियमित वाचन करावे.वाचनाने शैक्षणिक पात्रता उंचावते तर शैक्षणिक जीवनात परिपूर्णता येते असेही सालके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.पुस्तके वाटप केंद्रातील १० शाळांना करण्यात आली.यावेळी खरेदी विक्री संघांचे चेअरमन अतुल किंद्रे, संचालक नरेश चव्हाण, केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, ऍड.उदय कोंढाळकर, समीर देशपांडे, मुख्याध्यापक राजू कारभळ,संजय पवार,संदीप घाडगे,भारती गरुड, माधुरी घाटे ,विजयकुमार धालपे ,उषा गोरड ,आनंदा सावले ,अनिल महांगरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक शरद पवार यांनी केले.

To Top