सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रीय रैली मोटारसायकल रेस गट ब क्लास 5 सुपर स्पोर्ट 400सीसी मध्ये आणि डर्टटॉर्क क्लास 6 इंडियम एक्सपर्ट 261सीसी ते 550 सीसी या दोन्ही वेगवेगळया क्लासमधील रेस जिंकून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे यांनी देशात पहिला क्रमांक पटकावून चषक व वार्षिक पुरस्काराने यांना चेन्नईत सन्मानीत करण्यात आले.
फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया (FMSCI) नॅशनल रॅली चॅम्पियनशिप आणि “राष्ट्रीय डर्ट ट्रैक चैम्पियन” या नामांकित संस्थांतर्फे इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपची दुसरी फेरी कर्नाटकातील चिकमंगळूर आयोजित करण्यात आली होती. देशभरातील मोटर स्पोर्ट्समधील सर्वोत्तम आणि अनुभवी 124 रायडर्स चालकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून बारामती तालुक्यातील रोहित शिंदे याने 25 दुचाकीस्वारांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. सगळ्या offroad रेस 60 कि.मी. व 40 कि.मी. ट्रान्सपोर्ट करून 1 तास 2 मिनिटं 4 सेकंद हा रोहितचा ओव्हर ऑल टाईम आहे.
या पूर्वी रोहित शिंदे याने तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तिन्ही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले होते. रोहित आपल्या क्षमता आणि मेहनतीच्या जोरावर शर्यतीत सर्वत्र विजयाचा झेंडा फडकवत आहे. प्रथम पारितोषिक बेंगलोर, कोंबतूर, चेन्नई, रांची, नाशिक, कोल्हापूर, पुणे या सर्व राज्यात प्रथम बक्षीस मिळवला आहे. रॅली ऑफ कुर्ग, कर्नाटक येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याने आपली क्षमता सिद्ध करून प्रथम क्रमांक पटकावला. रोहित शिंदे याने बंगलोरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये 2023 मधे सूपर एथलीट देखील देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे.
याव्यतिरीक्त 2023 राष्ट्रीय स्टंटराइडिंग चॅम्पियनशिप देशात प्रथम, 2023 राष्ट्रीय मोटरसायकल रॅली चॅम्पियन व 2023 राष्ट्रीय मोटरसायकल डर्ट ट्रैक चैम्पियनशिप मिळवली आहे.
तसेच रोहितने चालू मोटरसायकलवर सूर्यनमस्कार घालणारा जगातील पहिला व्यक्ती आहे याची नोंद इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्या नावावर त्यांनी केले आहे. रोहितला उपजतच बाईक रेसिंगची आवड होती ती आवड छंदात रूपांतर झाली. हा छंद कधी त्याचा करिअर होउन बसले हे कळालेच नाही. बाईक रॅलीच्या या थरारक खेळात नावलौकीक मिळविलेला आहे. आणखीन यामध्ये नाव कमवायचे असल्याचे त्याने सांगितले. दैनंदिन तो दुचाकी शर्यतीचा सराव करीत असतो. रोहित शिंदे याने राष्ट्रीय स्पर्धेच्या फेरीत पदार्पण केले असून प्रथम क्रमांक मिळवून संपूर्ण भारतातील सर्वोत्तम बाइक रायडर्समध्ये आपले नाव नोंदविण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे.
पुढील काळात रोहितने बारामतीचे नाव बाईक रेसिंगमधे जागतिक पातळीवर घेउन जावे आशा शुभेच्छांच्या वर्षाव त्याच्यावर होत आहे
COMMENTS