Baramati News l ॲड. प्रियदर्शनी कोकरे खा. सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामती लोकसभा निवडणूक लढवणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
मुळच्या बारामती मधील पणदरे गावच्या प्रियदर्शनी कोकरे यांनी भाजपच्या सातारा जिल्हा सचिव पदातुन मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वच पक्षांनी ओबीसी समाज आरक्षण प्रश्नांसाठी ठाम भूमिका न घेतल्यामुळे, ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे, सर्वच पक्षांनी ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे म्हणून राजीनामा देत आहे,  बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रियदर्शनी कोकरे यांनी सांगितले.
       नुकतीच त्यांनी मुंबई येथे ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली होती. कोकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपली छाप पाडली आहे, गेल्या दोनवर्षांपासून त्या भाजपच्या सातारा जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होत्या उत्कृष्ठ भाषण कौशल्य फायर ब्रँड नेत्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, देवेंद्र फडणवीस, आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थिती मध्ये दोनवर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुळच्या बारामती तालुक्यातील पणदरे येथील आहेत यशवंत सेनेचे संस्थापक स्व बी.के. कोकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा,आणि बारामती लोकसभेत निवडणुक लढवली होती त्यावेळी प्रियदर्शनी कोकरे यांनी तब्बल ८० सभा गाजवल्या होत्या, तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आटपाडी मतदार संघातही स्टार प्रचारक म्हणून सभा घेतल्या, तसेच सातारा लोकसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत देखील जोरदार भाषणे केली होती. त्यांनी 6 महिन्यांपासून बारामती लोकसभा मतदार संघातून दौरे सुरु केले आहेत. दौऱ्याला उत्स्फूर्त मिळत आहे.असे यावेळी सांगितले.
To Top