Baramati News l भोर येथे पार पडलेल्या 'गाईड राज्यपुरस्कार' परीक्षेत वाणेवाडी विद्यालयाचेघवघवीत यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भारत स्काऊट गाईड संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 11 डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये राज्य प्रशिक्षण केंद्र  रामबाग भोर या ठिकाणी घेण्यात आलेल्या गाईड राज्य पुरस्कार परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयाच्या ऋतुजा जगताप, अंकिता भोसले, तृप्ती भोसले, संचिता दुदुस्कर, अनुष्का पवार, सरिता चव्हाण, पुनम बामणे, श्रेया निकम, श्रेया सावंत, वेदिका कदम, सृष्टी मोटे,समीक्षा भंडलकर, वैष्णवी मोरे, मेहेक आतार या 14 विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या.
          मागील तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक या स्वरूपामध्ये ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये तंबू बांधणे, त्याची नैसर्गिक वस्तू वापरून सजावट करणे,प्रथमोपचार, विविध गाठींचा उपयोग करून दैनंदिन वापराची गॅझेट तयार करणे, अंदाजाने उंची, अंतर मोजणे, नकाशा तयार करणे, मागच्या, शिट्टीच्या खुणा, होकायंत्र तयार करणे, बिन भांड्यांचा स्वयंपाक करणे, तंबू निरीक्षण ई च्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्याच बरोबर साक्षरता, पर्यावरण तज्ञ, प्रथमोपचार, स्वयंपाकी, स्वच्छ्ता प्रवर्तक,बागकाम, बुक बाईंडींग, योगा,कॅम्पर, मी मुक्त आहे, समूह कार्यकर्ता या सारख्या  बारा प्रकारच्या प्रावीण्य पदकांचा अभ्यासक्रम तीन वर्षात पूर्ण करावयाचा असतो. यावर परीक्षा घेतली जाते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने यासाठी आकुर्डी पुणे याठिकाणी पूर्व तयारी शिबिराचे आयोजन केले होते. सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, परीक्षा व मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे, संस्था सदस्य सुनील भोसले, प्रवीण भोसले विक्रम भोसले,प्राचार्य संजय कांबळे यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची कला शिकवणाऱ्या आभयासक्रमाचे मार्गदर्शन गाईड कॅप्टन प्राजक्ता यादव, सविता कांबळे स्काऊट मास्टर अशोक भोसले यांनी केले होते.
To Top