सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्याच्या बालवडी ता.भोर येथे शनिवार दि.१० ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चे सामुदायिक पारायण (अखंड हरिनाम सप्ताह ) सोहळा सुरू झाला.सोहळ्यात गेले ६ दिवसांपासून ज्ञानोबा माऊलींच्या नामाचा जयघोष होत असून सोहळ्यात तरुणांचा सहभाग उच्चांकी असल्याचे दिसून आले.
गुरुवर्य मामासाहेब देशपांडे यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी ह.भ.प शंकरराव किंद्रे व ह.भ.प गुलाबराव फणसे यांच्या प्रेरणेने सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताहाचे पन्नास वर्षे सुरू आहे. सप्ताहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बालवाडी गावासह परिसरातील लहान-थोर ज्ञान यज्ञात सामील होऊन सोहळ्याचा आनंद लुटत आहेत. सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन , काकडा,जागर व पारायण असे कार्यक्रम सुरू आहेत.तर संगीतमय रामायण कथा रामायणाचार्य ह.भ.प. पांडुरंग महाराज गव्हाणे यांनी केली.तर हरी जागर बालवडी,गोकवडी,आंबाडे, पाले ग्रामस्थ भजनी मंडळाने केला. तसेच ज्ञानेश्वरी पारायण दैनंदिन चिमुकल्याण सह ९० जणांचे सुरू होते.सोहळ्याची सांगता ह.भ.प सुनील महाराज शिंदे (आळंदी देवाची) यांच्या काल्याचे कीर्तने होणार आहे.त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.सप्ताह निमित्त सांप्रदायाचे गुढ जाणून घेण्यासाठी गावातील लहान - थोर भाविक भक्तांनी सात दिवस मोठी उपस्थिती लावली होती.
COMMENTS