Baramati News l सोरटेवाडी येथील अजिंक्य सोरटे यांची शासकीय लेखापरीक्षकपदी नियुक्ती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी,ता.बारामती येथील अजिंक्य शरद सोरटे या तरुणाची महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण नामतालिकेवर नुकतीच शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
        अजिक्य सोरटे हे बारामतीतील सोरटेवाडी गावचे रहिवाशी असुन त्यांचे अजिंक्य सोरटे अँन्ड असोसिएटस् या नावाने त्यांची टॅक्स कन्सल्टंसी फर्म आहे.अजिक्यं सोरटे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोरटेवाडी येथील माध्यमिक विद्यालय सोरेटेवाडी येथुन पुर्ण झाले असुन मु.सा.काकडे महाविदयालय सोमेश्वरनगर येथुन एम.कॅाम.पुर्ण केले आहे.तसेच राज्य शासनाच्या सहकार विभागाची जीडीसी ॲन्ड ए परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत.या यशाबद्दल त्यांचे परीसरातुन कौतुक होत आहे.
To Top