सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भारत ज्ञान विज्ञान समुदाय बारामती तालुका यांच्या वतीने पुस्तक स्टाँल लावण्यात आला होता. आज या ठिकाणी जवळपास चार हजार रुपयांची पुस्तके विकली.
मराठी भाषा दिनानिमित्त सोमेश्वर विद्यालय व भारत ज्ञान विज्ञान समुदाय यांच्या संयुक्त विद्यमानातून सोमेश्वर विद्यालयात पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आलेला होता. सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य पी. बी. जगताप यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शन व विक्री च्या स्टाँल चे उद्घाटन झाले. या पुस्तकांच्या स्टॉल लावण्यासाठी राजू बडदे, लता रीठे, राणी शेंडकर, धनंजय गायकवाड यांच्या मदतीने या स्टॉल लावण्यात आलेला होता. विद्यालयातून या पुस्तकाच्या स्टॉलला उदंड प्रतिसाद मिळाला जवळपास चार हजाराचे पुस्तक विकली गेली. आपल्या पुस्तकांच्या किंमती दहा वीस तीस रुपये अशा आहेत त्यामुळे चार हजाराची पुस्तक जाणं ही फार मोठी गोष्ट आहे दिवसभर मुलं त्या ठिकाणी पुस्तकाच्या स्टॉलवर होती शेवटी अगदी स्टॉल वरून मुलं हाकलायला लागली. यावरून एकच दिसून येते की वाचन संस्कृती अजून जिवंत आहे आपण मुलांच्या हातात पुस्तक द्यायला हवीत. असे मत राजू बदडे यांनी व्यक्त केले.
पर्यवेक्षक आर. बी. नलावडे, राजेंद्र झुरंगे, ग्रंथपाल सुजाता जगताप, मनीषा खोमणे, सुभाष तिटकारे आदींनी प्रश्नमंजुषा, भारुड, अभंग, कथाकथन असे उपक्रम घेतले. विजेत्या विद्यार्थ्यांना नलावडे यांनी पुस्तके बक्षीस दिली.
COMMENTS