सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
गुळुंचे ता.पुरंदर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा प्रवीण जोशी यांना मानाचा शारदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दि. २६ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त निरा शिवतकरार ग्रामपंचायतीच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिलिंद नारायण बोकील होते यावेळी डॉ. नितीन राजाराम केंजळे यांना भगवान परशुराम वैद्यकीय सेवा व श्रध्दा प्रविण जोशी यांना पत्रकारिता व सामाजिक कार्य यासाठी मानाचा शारदा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. डॉ. प्रसाद सुधाकर खंडागळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढयाविषयी अत्यंत मौल्यवान माहिती सांगितली भगवान परशुराम व शारदा पुरस्कार प्राप्त यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष मिलिंद बोकील यांनीअयक्षीय भाषणात समाधान व्यक्त केले. या वेळी निरा केंद्राचे सदस्य श्रीकांत नारायण कुळकर्णी यांना त्यांचे सुपुत्र सिध्दार्थ श्रीकांत कुलकर्णी यांना कोळी या प्राण्यांवर केलेल्या संशोधना बद्दल फेलोशिप प्राप्त झाल्याने त्यांना गौरविण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढमाळ व जेष्ठ सदस्य मुकुंद गणेश बोकील व देणगीदार सदस्य संकेत सोमप्रसाद केंजळे यांच्या सत्कार करण्यात आला. आभार व प्रास्ताविक केंद्र प्रमुख दत्तात्रय त्रिंबक बडबडे व सुत्रसंचलन वैष्णवी प्रसाद कामतकर यांनी केले.