सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपरे (खुर्द) गावचे हददीत निरा डावा कॅनॉलच्या कडेला निरगीलीचे झाडाखाली तीन पत्ती जुगार खेळताना सहा व्यक्ती मिळून आले. याबाबत संतोष बाळासाहेब मदने पो.हवा. ब.नं. 578 नेमणूक जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 26/02/2024 रोजी सायंकाळी 17:30 वा. चे सुमारास मौजे पिंपरे खुर्द गावचे हददीत निरा डावा कॅनॉलच्या कडेला निरगेलीचे झाडाखाली ता.पुरंदर जि.पुणे येथे 1) विकी बबन काळे (वय 30 वर्ष) रा.निरा वार्ड नं. 3 ता.पुरंदर जि.पुणे 2) राहुल शहाजी खलसे (वय 28 वर्ष) रा.वार्ड नं. 1 निरा ता. पुरंदर जि. पुणे 3) धर्मा सिताराम जाधव (वय 50 वर्ष) रा.निरा वार्ड नं. 1 ता.पुरंदर जि.पुणे 4) वसीम नजीर अत्तार (वय 36 वर्ष) रा.निरा वार्ड नं. 2 ता.पुरंदर जि.पुणे 5) सागर अंकुष जाधव (वय 27 वर्ष) रा. वार्ड नं.2 निरा ता. पुरंदर जि. पुणे 6) अथर्व आप्पासो कुचेकर (वय 19 वर्ष) रा.निरा वार्ड नं. 3 ता. पुरंदर जि. पुणे अशा इसमांची आपल्या कब्जात पत्त्यांचे कॅट व रोख रक्कम 2800/- रुपये बाळगून ‘‘तिन पत्ती’’नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले आहेत. म्हणून माझी त्यांचेविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे फिर्याद आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शकाखाली पो.ना. संतोष मदने हे करत आहेत.
COMMENTS