सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील सचिन सांगळे हे एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होते. आठ वर्षापूर्वी फलटण तालुक्यातील कुरवली बुl येथे काही क्षेत्र विकत घेत त्यामध्ये डाळिंब व द्राक्षे पिकाचे वेगवेगळे प्रयोग राबवित यावर्षीच्या महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारावर आपली मोहर उमटवली.
कुरवली बुद्रुक ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी सचिन सांगळे यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, यामध्ये कुरवली बुद्रुक ता. फलटण गावचे प्रगतशील बागायतदार, शेतीतज्ञ सचिन साधू सांगळे यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.
2016 चा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार या युवा शेतकऱ्याने मिळवला होता.