सुपे परगणा l बालवैज्ञानिकांनी सादर केले ७० विज्ञान प्रकल्प : सुप्यातील विद्याप्रतिष्ठान शाळेतील उपक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे बुधवारी ( दि. २८ ) "राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या" निमित्ताने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. यामध्ये इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाशी संबंधित अद्भुत असे ७० प्रकल्प स्वतः तयार करून सादर केले. 
           या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी वोल्कॅनो, रेन वॉटर हार्वेस्टिंग, चंद्रयान ३, रोबोट कार, रोबोटिक हँड, सोलर पावर, एअर प्रेशर, वॉटर पुरिफिकेशन, एअर कुलर, साऊंड सिस्टिम, एनर्जी कम्स फ्रॉम पेन्सिल, पेरिस्कोप, कुलर, ड्रोन, पेट्रोल पंप, वॉटर इलेक्ट्रिसिटी, चिली कटर, डान्सिंग रोबोट, शुगर फॅक्टरी, मिनी मिक्सर अशा विविध व अद्भुत ७० प्रकल्पांचा विज्ञान प्रदर्शनामध्ये समावेश होता.
                 या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक वृत्तीला वाव मिळाला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी स्वतः वैज्ञानिकांच्या व संशोधकांच्या भूमिकेत जाऊन स्वतः प्रकल्पांविषयी माहिती घेऊन स्वतः प्रकल्प तयार केले. तसेच त्या संबंधित माहिती इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली. यासंदर्भातील मार्गदर्शन प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी कोंढारे यांनी केले. तर आभार दीप्ती मोरे यांनी मानले.
          ....................................

To Top