खंडाळा l मरीआईचीवाडी फाटा ते पिंपरे बु|| या रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने करा : अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम.....
नीरा : विजय लकडे. 
खंडाळा तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग ६ मध्ये मोडत असलेला मरीआईचीवाडी  ते पिंपरे बु||
पर्यंतचा रास्ता गेली ३ वर्षापासून खराब अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या  रस्त्याचे  प्रलंबित असलेले काम तातडीने न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा  परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश केसकर यांनी  दिला आहे . 
          या बाबतचे निवेदन खंडाळयाचे तहसिलदार , खंडाळ्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना देण्यात आले आहे. मरीआईचीवाडी  ते पिंपरे बु|| या रस्त्याचे काम ०२ जुलै २०१४ ला  चालू झाले होते ते काम ०१ मार्च २०१६ पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यापासून ५ वर्षासाठी संबंधित कंपनी कडे तो रास्ता मेंटेनंसाठी असतो १ मार्च २०२१ ला रास्ता मेन्टेनसाठीचा कार्यकाळ संपला आहे. हा वेळ संपून ३ वर्ष झाली असून आम्ही संबंधित विभागाला वारंवार या बाबत आम्ही पाठपुरावा केला १५ नोव्हेंबर २०२२, ७ मार्च २०२२, १२ जानेवारी २०२४ या तारखेला गणेेेश केसकर यांनी समक्ष भेट घेऊन निवेदन हि दिले.
            तसेच वारंवार संबंधित विभागाचे लक्ष  या समस्येकडे वेधले. तसेच सा.बांधकाम विभागाने हि  ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या वेळेला रस्त्याचे डागडुजीचे काम करण्याचे आदेश संबंधित कॉन्ट्रॅक्टर ला दिले होते. परंतु कामाचा दर्जा खूपच खराब पद्धतीने पूर्ण केल्याने रास्ता लगेचच खराब होत होता. यामुळे लोकांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आता नवीन रस्त्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जातेय आणि हि मागणी रास्तच आहे.
१२ जानेवारी २०२४ रोजी ग्रामस्थांनी  संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी   फेब्रुवारी संपेपर्यंत कामाला सुरुवात होईल असे आश्वासन 
देऊनही आजपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. येत्या ४ मार्च २०२४ पर्यंत जर रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही झाली तर पंचक्रोशीतील सर्व  नागरिक  जो पर्यंत काम चालू हाेत नाही तो पर्यंत रास्ता रोको करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे..
To Top