सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी भोर - वेल्हा - मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांची नियुक्ती करण्यात आली.अखिल भारतीय काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांच्या अनुमतीने नियुक्ती केल्याची घोषणा जनरल सेक्रेटरी के.सी. वेणूगोपाल यांनी केली. या आशयाचे पत्र महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांना नुकतेच दिले.
आमदार संग्राम थोपटे यांची काँग्रेसचे निष्ठावंत आमदार म्हणून ओळख आहे.त्यांनी भोर- वेल्हा - मुळशी तालुक्यात आणि दुर्गम भागात सातत्याने नवनवीन विकास कामे व योजना राबविल्या आहेत.तर नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत जी महत्वाची जबाबदारी दिलेली आहे.ती जबाबदारी पार पाडताना पक्षहित लक्षात घेवून कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत पारदर्शी काम करणार आसल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.