सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
परिंचे : राहुल वाघोले
श्रीक्षेत्र वीर ( ता .पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात पंचमी निमित्त तात्यासाहेब बुरुंगले यांची भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली यावेळी हजारो भाविक व शेतकरी उपस्थित होते. गुलालखोबऱ्याची उधळण करीत फुलांनी सजवलेल्या पालख्यांच्या व वस्त्र परिधान केलेल्या काठ्यांच्या दोन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून भाकणूकीला सुरवात करण्यात आली यावेळी संपूर्ण मंदिर परिसर नाथांच्या जयघोषात न्हाऊन गेला होता.श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांचेमार्फत अतिशय उत्तम पद्धतीने यात्रा नियोजन व व्यवस्थापन चालू आहे.
पंचमी निमित्त पहाटे स. ४ वाजता देवाची पूजा करून देवाला पोशाख करण्यात आला. सकाळी ११ वाजता दरवाजा बंद होऊन ११.३० वाजता मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले झाले. मंदिर परिसरात गजेगोपाळ जेवण सुरु झाले. दुपारी १:३०वा. सर्व काठ्या पालख्या देऊळवाड्यात आल्या. आरती होऊन छबिण्याला सुरुवात झाली. यावेळी श्री क्षेत्र वीर, कोडीत, कन्हेरी, वाई, भोंडवेवाडी, सोनवडी, कसबा पुणे, राजेवाडी गावच्या पालख्या देऊळवाड्यात उपस्थित होत्या.
एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर दुपारी २.१५ मिनिटांनी देवाचे मानकरी श्री. तात्यासो बुरुंगले यांच्या अंगात संचार येऊन वार्षिक पीकपाणी, भविष्यवाणी सांगण्यात आली.भाकणुकीत सांगितल्याप्रमाणे यावर्षी मृगाचे पाणी चार खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल दोन खंडात साधारण राहील, हत्तीचे पाणी चार खंडात जनतेचे समाधान होईल. बाजरी पीक चांगले, उतरा,पूर्वा, तीन खंडात पडेल, चौथ्या खंडात साधारण राहील. गाई-गुरे यांचेमागील रोगराई हटली आहे, मनुष्याच्या मागे साधारण आटापिटा राहील. गादीचा मालक गादिवर येईल अशाप्रकारे भाकणूक सांगण्यात आली.
पालख्यासोबत दोन प्रदक्षिणा होऊन काठ्या-पालख्या आपापल्या पालखीतळावर मार्गस्थ झाल्या. यावेळी हजारो भाविक मंदिर उपस्थित होते. सर्व सालकरी, दागीनदार, मानकरी व प्रमुख पालख्या यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात आले आहेत. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष प्रल्हाद धुमाळ , उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ, विश्वस्त हनुमंत(बाबुकाका) धुमाळ, नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे, राजेंद्र कुरपड, सल्लागार इ. ट्रस्ट तर्फे व्यवस्था पहिली.
...
COMMENTS