Baramati News l सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोमेश्वर सायन्स कॉलेजला नॅकचे मानांकन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर सायन्स कॉलेजमध्ये नुकतेच नॅकचे मूल्यांकन पूर्ण झाले.
        दिनांक - १४ व १५ फेब्रुवारी २०२४ रोजी नॅक मुल्यांकनासाठी तामिळनाडू विद्यापीठाचे डॉ. एस. नागराजन यांच्या अध्यक्षते खाली हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे डॉ. अमन कुमार शर्मा आणि कर्नाटकचे डॉ राजशेखर हिरेमठ उपस्थित होते. या समितीने सन २०१७ ते २०२२ या कालावधीतील महाविद्यालयाच्या सर्वांगीण कामकाजाचे मुल्यमापन केले. २००७ पासून सोमेश्वर परिसरामध्ये ज्ञानदानासाठी कार्यरत असणाऱ्या सोमेश्वर सायन्स कॉलेजच्या अभ्यासक्रम, अध्यापन अध्ययन, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थी विकास, ई-शासन व व्यवस्थापन, आणि संस्थात्मक मूल्य व वेगळेपण या निकषानुसार केलेल्या मुल्यमापनाच्या आधारे नॅक समितीने सोमेश्वर सायन्स कॉलेजला नॅक अक्रिडेटेड, ब प्रमाणपत्र प्रदान करून घोषित केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी यांनी दिली.
        या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सचिव भारत खोमणे यांनी महाविद्यालयाचे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
To Top