सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला सोमेश्वर केंद्रावर शांततेत सुरुवात झाली. सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सोमेश्वर विद्यालयात दहावीच्या परीक्षेचे केंद्र असून या ठिकाणी सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर, बा.सा. काकडे विद्यालय निंबूत, उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी, सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे, सोमेश्वर पब्लिक स्कूल आणि सोरटेवाडी माध्यमिक विद्यालय या विद्यालयातील सुमारे ३८७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. चालू वर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक पी. बी. जगताप, बा.सा. काकडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिपाली ननावरे, पर्यवेक्षक आर.बी. नलवडे, क्रीडा शिक्षक युवराज शिंदे, दिलीप वाडकर, पत्रकार महेश जगताप, युवराज खोमणे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथील केंद्रावर १८८ विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य सुनील भोसले यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व भागशाळा मुरूम, न्यू इंग्लिश स्कूल वाकी पांढरवस्ती, माध्यमिक विद्यालय गरदडवाडी या विद्यालयातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यावेळी मुख्याध्यापक संजय कांबळे, वाकी विद्यालयाचे मुख्याध्यापक शब्बीर इनामदार, गरदडवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन कोकरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS